काँग्रेसवर मोठी नामुष्की?

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसल्याने काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवू शकेल एवढे संख्याबळही काँग्रेसकडे लोकसभेत नाही. येणार्‍या काळात तर काँग्रेसला अजून धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण २०२२मध्ये वेगवेगळ्या कालावधीत राज्यसभेच्या ७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेसला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या १३ जागांसाठी येत्या ३१ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. या १३ जगांपैकी ५ जागा पंजाबमधील आहेत. पंजाबमध्ये आपचे वर्चस्व असल्याने या पाचही जागांवर आपचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. उरलेल्या ८ जागांपैकी आसाममध्ये दोन, केरळातील तीन, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा सामावेश आहे. या १३ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ५ एप्रिल रोजी संपत आहे. तर वर्षअखेरीपर्यंत उत्तर प्रदेशातील ११, बिहारच्या पाच, राजस्थानच्या चार, मध्यप्रदेशातील तीन आणि उत्तराखंडच्या एका जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्याशिवाय ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना आणि आंध्रप्रदेशातील जागांवर निवडणुका होणार आहे. यात काँगे्रेसला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.



राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या १०० च्या पुढे जाईल

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचा परिणाम आता थेट राज्यसभेवर दिसणार आहे. किंबहुना, पाचही राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आता राज्यसभेतील त्यांच्या संख्येवर परिणाम होणार आहे. काँग्रेस पक्षाला राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागू शकते आणि त्याची शक्यता खूप जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, २०२२ मध्ये राज्यसभेच्या जवळपास ७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेत सध्या काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. यंदा होत असलेल्या निवडणुकानंतर काँग्रेसची सदस्यसंख्या २५ च्या खाली येऊ शकते. तसे झाल्यास पक्षाकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद जाईल. राज्यसभेतील एकूण सदस्यसंख्या २५० आहे. यातील २३८ सदस्य निवडून येतात. तर १२ सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात. राज्यांमधील आमदार राज्यसभेचे खासदार निवडतात. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांमधील निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. याचा परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. ३१ मार्चला राज्यसभेच्या १३ जागांसाठी निवडणूक होईल. यातील ५ जागा पंजाबच्या आहेत. तर इतर ८ जागांमध्ये आसामच्या २, केरळच्या ३, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. वर्षाअखेरीस उत्तर प्रदेशातील ११, बिहारच्या ५, राजस्थानच्या ४, मध्य प्रदेशच्या ३ आणि उत्तराखंडच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. याशिवाय ओदिशा, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील जागांवरही निवडणुका आहेत. पंजाबमधील मोठ्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे १८ आमदार आहेत. तर आपचे ९२ उमेदवार निवडून आले. त्यामुळे पंजाबमधील राज्यसभेच्या पाचही जागा आपकडे जातील. त्यामुळे आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या ३ वरून ८ वर जाईल. केरळमधील एक जागा काँग्रेसला मिळेल. आसाममधील एक जागाही काँग्रेसला मिळू शकेल. राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या लवकरच १०० च्या पुढे जाईल. याशिवाय भाजपप्रणित एनडीए बहुमताचा आकडा गाठेल. 

देशाला सक्षम विरोधीपक्षाची गरज

सध्या राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ९७ आहे. निवडणुकांनंतर ती १०४ होईल. तर एनडीएचं संख्याबळ १२२ पर्यंत जाईल. त्यामुळे २४३ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत एनडीएकडे बहुमत असेल. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे ३४ सदस्य आहेत. वर्षाअखेरीस हा आकडा २७ पर्यंत येईल. राज्यसभेच्या काँग्रेसच्या सदस्यांनी पक्ष सोडल्यास हा आकडा २५ च्या खाली येऊ शकतो. तसे झाल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या हातून जाईल. काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा दर्जा नाही कारण सध्या सभागृहातील त्यांची संख्या एकूण सदस्यांच्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी किमान २५ जागा असणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे सध्या ३४ सदस्य आहेत. सध्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे सभागृहात विरोधी पक्षनेते आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांबाबत काँग्रेसला मोठी आशा होती. या निवडणुकांद्वारे पुन्हा कमबॅक करू असा विश्वास काँग्रेसला होता. मात्र, पाच राज्यांपैकी सत्ता नसलेल्या चार राज्यात काँग्रेसची कामगिरी खराब झालीच शिवाय सत्ता असलेले पंजाब राज्यही काँग्रेसच्या हातचे निघून गेले. काँग्रेसला पंजाबमध्ये ११७ पैकी केवळ १८ जागा मिळाल्या. तर आपला ९२ जागांवर विजय मिळाला. सध्या राज्यसभेत भाजपची सदस्य संख्या ९७ आहे. या वर्षअखेरीपर्यंत भाजपची ही संख्या वाढून १०४ होण्याची शक्यता आहे. तर एनडीएची सदस्य संख्या वाढून १२२ होणार आहे. त्यामुळे भाजप राज्यसभेत बहुमतात येणार आहे. एकंदरीत २०१४ पासून काँग्रेसला लागलेली उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. काँगे्रेसचे नेतृत्व कुणी करायाचे यावरुन गांधी घराण्याचे विश्‍वासू व नाराज जी-२३ असे दोन गट पडलेले आहेत. पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक देखील पार पडली मात्र त्यातही काही ठोस निर्णय घेण्यात आले नाही. काँग्रेसमध्ये वरिष्ठपातळीवर ठोस निर्णय होत नसल्याचे अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जर हे असेच सुरु राहिले तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचा मुकाबला करणे तर दुरच पण स्वत:चे अस्तित्व ठिकवण्यासाठी काँग्रेसला धडपड करावी लागेल, याचे स्पष्ट चित्र सध्याच्या त्यांच्या वाटचालीवरुन दिसत आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. या देशाला सक्षम विरोधीपक्षाची गरज आहे. यासाठी काँग्रेसने मरगळ झटकून सर्वशक्तीनिशी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. काँगे्रेसला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर खुशमस्कर्‍यांना दूर सारून ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

Post a Comment

Designed By Blogger