उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : रुरल टू ग्लोबल एज्युकेशन



कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असे भाकित प्रख्यात नेल्सन या सर्वेेक्षण कंपनीने केले होते. ते तंतोतंत खरे ठरले यापुर्वीही गुजरातमध्ये नरेंद्र मोद्री हॅट्रीक करतील व उत्तर प्रदरेशमध्ये मुलायम राज येईल तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत यु.पी.ए.२ ला बहुमत मिळेल. असा त्यांनी नोंदविलेला एक्झीट पोल खरा ठरला होता. याच नेल्सन कंपनीने देशातील अत्यंत प्रतिष्ठीत अशा इंडिया टूडे या नियतकालीकासोबत देशभरातील  ६२० विद्यापीठांचा अभ्यास करुन सर्वोत्कृष्ट ५० विद्यापीठांची यादी नुकतीच जाहीर केली यात ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ग्लोबल भरारी घेत ४० व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. स्थापनेला १००-१२५ वर्षे झालेल्या दिग्गज विद्यापीठाला जेमतेम २०-२२ वर्षे वय असलेल्या उमविने जोरदार टक्कर देत मिळविलेला हा विजय निश्‍चितच मोठा आहे. 

जळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १९९० साली पुणे विद्यापीठाचे विभाजन होवून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. अल्पावधतीच उमविने नेत्रदिपक कामगिरी करीत केवळ राष्ट्रीयच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर देखील झेंडा फडकाविला आहे. यात उमविच्या सर्व कुलगुरुंचे निश्‍चितच मोठे योगदान आहे हे नाकारता येणार नाही. यावर कळस रचला तो डॉ.सुधीर मेश्राम यांनी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी  ८ सप्टेंबर, २०११ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारले. आपले युजीसी व दिल्ली दरबारी असलेले वजन वापरत युजीसीसह जैव तंत्रज्ञान विभाग (डिबीडी), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), सीएसआयआर, बीएआरसी, एआयसीटीई, डीआरडीओ, आयएनएसए, आरजीएसटी आदी वित्तीय संस्थांमार्फत संशोधकांना भरीव निधी उपलब्ध करुन देत अमेरिकेच्या कायुगा कम्युनिटी कॉलेज, मेक्सीकोच्या सेटीस विद्यापीठांसोबत इंजिनिअरींग, मॅनेजमेंट व एज्युकेशन तसेच जापानच्या टुकूसीमा विद्यापीठाशी इंजिनिअरींग अभ्यासक्रमाबाबत सामंजस्य करार त्यांच्याच कार्यकाळात झाले. यातच देशातील सर्वोत्कृष्ट ५० विद्यांपीठामध्ये उमविचा समावेश होत खान्देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा देखील यात कार्याकाळात रोवला गेला.

इंडिया टुडे व नेल्सनचा सर्व्हे

सन २०१३ साठी इंडिया टूडे ने नेल्सन या मार्केटिंग रिसर्च आणि कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने नुकतेच भारतातील ६२० विद्यापीठांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, विश्वासार्हता, विद्यार्थ्यांच्या योजना, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणार्‍या रोजगाराची  संधी, शिक्षक, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रसिध्द झालेले शोधनिबंध व त्या शोधनिबंधांचे दिले जाणारे पून:संदर्भ, विद्यापीठाला प्राप्त झालेला निधी, विद्यापीठाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि जागतिक पातळीवर मिळणारी संधी अशा काही प्रमुख मुद्यांच्या आधारे उत्कृष्ट ५० विद्यापीठांचे रॅकिंग केले गेले. यामध्ये, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ४० वे स्थान प्राप्त झाले आहे. जुन्या विद्यापीठांना बाजुला सारून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गुणवत्तेच्या आधारे हे स्थान प्राप्त केले आहे. यात प्रतिष्ठेत ४४ वा, शेक्षणिक योगदान गुणवत्तेत ३६, विद्यार्थ्यांकडे लक्ष ४४, पायाभुत सुविधांमध्ये ४३, शिक्षणानंतर नोकरीच्या संधी ४२, फॅकल्टी १८, रिसर्च पब्लिकेशन ४५, इनोव्हेशन व गव्हरनलमध्ये ३९, ग्लोबर एक्पोझर ४४, सुरक्षा व्यवस्था ४४, प्रवेश प्रक्रिया ४०, अवधारात्मक रॅकिंग ४४ तर तथ्यात्मक रँकिंगमध्ये उमविला २४ वे स्थान देण्यात आले आहे. विद्यापीठाला १०० पैकी १०.७० गुण देण्यात आले आहेत.

या सर्वेनुसार दिल्ली विद्यापीठाला प्रथम क्रमांक देण्यात आला असून १०० पैकी १०० गुण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कलकत्ता विद्यापीठ (७७.३४ गुण), जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली (७४.६३), बनारस हिंदू युनिव्हरसिटी (६०.६९), मुंबई विद्यापीठ(५८.८४), हैद्राबाद विद्यापीठ (५१.४८), उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद (५१.४८), अलीगड मुस्लिम विद्यापीठ (३८.९८), जामियामिल्लीया इस्लामिया दिल्ली (३८.३१), पॉंडेचेरी विद्यापीठ (३५.०९), मैसुर विद्यापीठ (३१.९८), आंध्र विद्यापीठ विशाखापट्टनम (३१.२१), कुरुक्षेत्र विद्यापीठ(२७.१२), विश्‍वभारती, शांतीनिकेतन (२३.७७), बिरला इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड सायन्स पिलानी(२२.०५), बंगरुळ विद्यापीठ (२१.९०), जैन विद्यापीठ  बंगरुळ (२१.०२), महाराजा सयाजीराव विद्यापीठ वढोदरा (२०.७२), केरळ विद्यापीठ (१८.६३), गोवा विद्यापीठ (१८.५१), एमीटी विद्यापीठ नोएडा(१८.४६), गुरुनानक देव विद्यापीठ (१८.४०), क्राईस्ट विद्यापीठ बंगरुळ (१८.३८), एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई (१७.६८), मंगलुर विद्यापीठ (१७.४८), कालीकत विद्यापीठ मल्लापुरम (१७.४८), उत्कल विद्यापीठ भुवनेश्‍वर (१६.३२), गुजरात विद्यापीठ (१५.७६), मनिपाल ऍकडमी ऑफ हायर एज्युकेशन (१५.३९), कर्नाटक विद्यापीठ (१५.०२),  बनस्थळी विद्यापीठ जयपूर (१४.७२), भरतीयार विद्यापीठ कोयम्बतुर (१४.३६), काकतिय विद्यापीठ वारंगल (१३.७९), गुवाहटी विद्यापीठ (१२.९७), भारती विद्यापीठ पुणे (१२.६२), महात्मा गांधी विद्यापीठ कोट्टायंग (१२.४७), राजस्थान विद्यापीठ (११.६३), श्रीव्येंकटेश्‍वर विद्यापीठ तिरुपती (१०.५२), वर्धवान विद्यापीठ वर्धमान (१०.८५), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव (१०.७०), कोचीन युनिवर्सिटी ऑफ सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी (१०.६९), एसआरएम इंस्टिट्युट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी चैन्नई (१०.३५), आसाम विद्यापीठ (१०.१५), रांची विद्यापीठ (९.६७), श्रीकृष्ण देवराय विद्यापीठ अनंतपुर (९.६५), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठ वाडा विद्यापीठ औरंगाबाद (७.९८), जयपुर नॅशनल युनिवर्सिटी (६.८५), हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजराथ युनिवर्सिटी (६.४८), महात्मा गांधा काशी विदद्यापीठ वाराणसी (६.१३) व ५० व्या क्रमांकावर महाराजा कृष्णकुमार सिंहजी भावनगर विद्यापीठ (५.९४) यांचा समावेश आहे. 

Post a Comment

Designed By Blogger