जळगावमध्ये जन्मलेली, अनाथ आश्रममध्ये वाढलेली खुशी आज आहे प्रसिध्द अभिनेत्री

खुशी शाह एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. खुशी शाहने गुजराती, दक्षिण भारतीय, भोजपुरी तसेच राजस्थानी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच खुशी शाह ‘अफरा तफरी’ आणि ‘नेनापिडेया’मध्ये दिसली होती. ६ मे रोजी प्रदर्शित झालेल्या नायिका देवी द वॉरियर क्वीनमध्ये अभिनेत्री समांतर लीडमध्ये दिसणार आहे. अगदी लहान वयातच जीवनाशी संघर्ष करणार्‍या या गुणी अभिनेत्रीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या प्रसिध्द अभिनेत्रीचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिनेच हा खुलासा केला आहे.खुशीचा जन्म १९ नोव्हेंबर १९८५ ला जळगाव जिल्ह्यात झाला. जन्मानंतर अवघ्या एका वर्षात तिच्या आईला घरात लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर आजी व वडीलांनी खुशीला सांभाळले पण ती सात वर्षांची असतांना आजीचा देखील मृत्यू झाला. तेंव्हा तील १५० रुपये भाडे असलेल्या दोन खोल्यांच्या एका तोडक्या मोडक्या घरात राहत होती. तिला लहानपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड असल्याने शाळेतील गॅदरिंगमध्ये ती भाग घेत असे. खुशी ९ वर्षांची असतांना तिच्या वडिलांना तीव्र ह्दयविकाराचा झटका आला. तेंव्हा खुशी इतकी लहान होती की वडिलांच्या उपचारासाठी कसे असतील, यामुळे उपचाराअभावी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे तिच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला. यातून सावरण्यासाठी मदत तर दुरच मात्र त्यावेळी तिला जवळ घेणारेही कुणी नव्हते. यामुळे तिला अनाथ आश्रमध्ये पाठविण्यात आले. थोडं मोठं झाल्यानंतर तिला तिचे अपुर्ण राहिलेले स्वप्न खुणावत होते. लवकर लग्न न करता आधी स्वत:ला सिध्द करायचं, अशी खुणगाठ मनाशी बांधून तिनं अनाथ आश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. खुशीने अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. यामुळे वडिलांचं स्वप्न व स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तिने अ‍ॅक्टिंग करिअरकडे मोर्चा वळवला.

सुरुवातीचे दिवस असे होते की, खुशीला केवळ एक वडापाव खाऊन दिवस काढावा लागायचा. मात्र तिने हिंमत सोडली नाही. १६ वर्षांच्या प्रचंड संघर्षनंतर तिने स्वत:ला सिध्द केलं आहे. आज तिची स्वतंत्र्य अशी ओळख निर्माण झाली आहे. जीवनात आलेल्या संकटांमुळेच स्वत:ला सिध्द करता आले, असे खुशी म्हणते. स्वत:च्या जीवनप्रवासावर तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जुन्या फोटांच्या मदतीने तयार केलेली रिल अपलोड केली आहे. तिचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला असल्याचे खुद्द तिनेच रिलमध्ये म्हटले आहे.

‘नायिका देवी द वॉरियर क्वीन’ हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नायिका देवी ही १२व्या शतकातील पहिली महिला योद्धा राणी होती. ती एक राणी, पत्नी, आई आणि योद्धा होती ज्याने युद्धकलेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. ती गुजरातची शान होती. खुशी शाहने ही भुमिका साकारत स्वत:ला सिध्द् केलं आहे.

Post a Comment

Designed By Blogger