डॉ.उल्हास पाटील यांनी २८ मे १९८८ रोजी जळगाव शहरातील बस स्टॅण्डजवळ एका खोलीत ओपीडी सुरु करुन वैद्यकीय सेवेला सुरुवात केली होती. त्यास आज ३५ वर्ष पूर्ण होत आहे. भाडेतत्वावरील एका खोलीतून सुरु झालेली वैद्यकीय सेवा आज ३५ एकरात विस्तारलेल्या गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाच्या रुपाने विस्तारली आहे.
तब्बल ३५ वर्षे अविरतपणे चालणार्या या रुग्णसेवेच्या प्रवासावर टाकलेला एक प्रकाश…
मागील ३५ वर्षाचा काळात स्त्रीरोग विभागापासून सुरु झालेली गोदावरीची वैद्यकीय सेवेचा अफाट विस्तार झाला आहे. आजमितीस डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालय हे तब्बल १२०० बेडचे हॉस्पिटल झाले आहे. येथे ४०० ते ४५० निष्णात तज्ञ डॉक्टर्स अविरतपणे सेवा देत असून त्यांच्या मदतीला १२०० नर्सिंग स्टाफ आहे. रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी हॉस्पीटलने १३ हजार किलो लिटरचे स्वतंत्र दोन ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. यासह हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा पीएसए ऑक्सिजन प्लांट देखील येथे उभारण्यात आला आहे. रुग्णालयात एमआयसीयू, एसआयसीयू, सीआयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, ओपन बायपास सर्जरीसाठी स्वतंत्र आयसीयू असे सर्व प्रकारचे अत्याधुनिक आयसीयू आहेत. तब्बल १४ विभागांद्वारे विदर्भ, खान्देश, मराठवाडा किनारा व मध्यप्रदेशातील हजारो रुग्णांनी या वैद्यकीय सेवेच्या रथाद्वारे उपचार घेऊन विकारमुक्त झाले.
डॉ.उल्हास पाटील यांनी १९८८ मध्ये सुरु केलेल्या मॅटर्निटी हॉस्पिटलचा विस्तार २००८ मध्ये गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाला. आता केवळ जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भ व मध्यप्रदेशातील गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. अनेक दूर्धर आजारांवर तज्ञांद्वारे येथे यशस्वी शस्त्रक्रिया तसेच उपचार केले जातात. दररोज ४ ते ५ मोफत आरोेग्य तपासणी शिबिरातून १ हजारापर्यंत रुग्णांवर उपचार केले जातात.
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सर्वच आजारांवर उपचार उपलब्ध करुन देण्यात आले. यात सर्व प्रकारचे कर्करोग, एन्डोस्कोपीद्वारे निदान व उपचार, दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी, हर्नियासह विविध आजारांवर उपचार, लहान बालकांवरील सर्वच शस्त्रक्रिया येथे बालरोग शल्यचिकित्सकांद्वारे सुलभरित्या केल्या जातात, तसेच नवजात शिशूंसाठी इंटेसिव्ह केअर युनिट आणि तेथे तज्ञ बालरोग तज्ञांचा टिम २४ तास सेवा देते. याशिवाय मुतखडा, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशय खडा, प्लीहा, विविध प्रकारच्या गाठी, थायरॉईड, पाईल्स, भगंदर, डायबेटिक फूट, अल्सर, अपेंडीक्स अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी तज्ञ डॉक्टर्स, भुलरोग तज्ञही येथे आहेत. तसेच मधुमेह, रक्तदाब, दारुमुळे उद्भवलेले आजार, पक्षाघात, विषबाधा, किडनी विकार, पोटाचे आजार अशा सर्वच विकारांवर मेडिसीन विभागाद्वारे उपचार येथे होत आहे.
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर रुग्णाला कुठल्याच गोष्टींसाठी बाहेर जावे लागत नाही, येथे एकाच छताखाली मेडिकल सेवा, रेडिओलॉजी सुविधा यात एक्स रे-सोनोग्राफी-सीटी स्कॅन-एमआरआय, मध्यवर्ती प्रयोगशाळा, रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, डायलिसीस सेवा येथेच उपलब्ध आहे. त्यामुळे रक्त-लघवीसह कुठल्याही प्रकारच्या तपासण्या येथे होतात. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णांवर येथे उपचार होतात, याशिवाय इएसआयसी, कॅशलेस सेवा, रेल्वे हॉस्पिटलच्या रुग्णांचीही येथे सेवा-सुश्रृषा केली जाते.
रुग्णालयात मेडिसीन, ऑर्थोपेडिक, कान-नाक-घसा, नेत्रालय, त्वचाविकार, मानसिक आजार, संकल्प व्यसनमुक्ती केंद्र, सर्जरी, हृदयालय अशा विविध विभागांद्वारे रुग्णांना केसपेपर पासून ते डॉक्टरांच्या सल्ल्यापर्यंत मोफत सेवा दिली जाते. रुग्णालयात सव्वाशेहून अधिक तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टिम २४ तास सेवेसाठी उपलब्ध असते. गंभीर, अतिगंभीर अशा कुठल्याही रुग्णांवर येथे येताच तात्काळ उपचार केले जातात. वैशिष्ट्ये म्हणजे विविध आजारांचे तज्ञ एकाच छताखाली असल्याने रुग्णाच्या प्रकुतीबाबत तत्काळ योग्य उपचाराची दिशा ठरविली जाते.
हार्ट अटॅकच्या रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये उपचार देण्यासाठी येथे हृदयालयात तत्परतेने सेवा दिली जाते. हृदयालयात जगातील सर्वोत्तम बेस्ट कॅथलॅब असून डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील हे येेथे रुग्णांना उपचार देण्यासाठी उपलब्ध असतात. टू डी इको, स्ट्रेस टेस्ट, एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टी, बायपास अशा हृदयाशी निगडीत सर्व प्रकारच्या उपचार पद्धती येथे आहे. दर महिन्यातील सोमवार आणि बुधवारी येथे हृदयात छिद्र असलेल्या बालकांच मोफत स्क्रिनिंग केली जाते तसेच महिन्यातून एकदा दिल्लीतील तज्ञांद्वारे येथे एएसडी/व्हीएसडी या प्रोसिजर योजनेंतर्गत मोफत केल्या जातात. या उपचारांमुळे रुग्णांना नविन उत्तम आयुष्य मिळते. केवळ जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या पाच ते सहा जिल्ह्यांमधील रुग्णांना जीवनदान देणार्या गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाला मानाचा मुजरा.
Post a Comment