शाळाप्रवेश ‘लॉकडाऊन’ झाल्याने पालकांना टेन्शन!लॉकडाऊनमुळे पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश कसे होतील अशी चिंता पालकांना सतावत आहे. विशेषत: पूर्वप्राथमिक अर्थात नर्सरी, ज्यूनियअर केजी व सिनीअर केजीत प्रवेशाचे अनेक पालकांना टेन्शन आले आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमधील पूर्वप्राथमिक प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेश प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा देखील सुरू झालेला नाही. मात्र अनेक खाजगी शाळांमध्ये प्रवेश सुरु झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसरीकडे सीबीएसईच्या शाळांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर वस्तूस्थिती काय आहे व पालकांनी नेमके काय करावे? याविषयावर शिक्षणतज्ञ तथा जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार सर यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद.....


Post a Comment

Designed By Blogger