कोरोनाच्या संकटात सोन्यातील गुंतवणूक किती सुरक्षित?



जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला असलेली मागणी टिकून आहे. सोनेआधारित ईटीएफमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असून, त्यामुळे जागतिक पातळीवर या उत्पादनांमधील सोन्याचे प्रमाण ३,१८५ टन इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. या उलट, सुवर्ण बाजारपेठेत दागिन्यांना असलेल्या मागणीत घट झाली. गेल्या तिन महिन्यात दागिन्यांच्या मागण्यांवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊन तिमाही मागणी ३९ टक्क्यांनी घटून नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असणार्‍या जळगावला देखील याचा फटका बसला आहे. या विषयावर आर.सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक सिध्दार्थ बाफना यांच्याशी दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....

Post a Comment

Designed By Blogger