मनोरंजनाचे लॉकडाऊन



टीव्हीवर दाखविले जाणारे विविध कार्यक्रम, विशेषत: महिलावर्गाच्या सिरियल्स गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे जणू एकाप्रकारे मनोरंजनाचेच लॉकडाऊन झाले आहे. कला क्षेत्रातील अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात काही कलाकार ऑनलाईन कार्यक्रमांचच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना भेटत आहेत. याच विषयावर पुण्यातील प्रसिध्द व्हाईस आर्टिस्ट तथा सुत्रसंचालिका आदिती कुलकर्णी यांच्याशी जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी साधलेला ऑनलाईन संवाद....

आदिती कुलकर्णी यांनी व्हाईस आर्टिस्ट म्हणून गेल्या ८ वर्षात वेगवेगळ्या जाहिराती, शॉर्ट फिल्म, डॉक्यूमेेंट्रीज, प्रोमो क्‍लिप्स्ला आवाज दिला आहे. सूत्रसंचालक म्हणून अनेक दिग्गज मंडळींच्या कार्यक्रमात त्यांनी धुरा सांभाळली आहे. त्या पुणे आकाशवाणी वर देखील काही वर्षे कार्यरत होत्या. यासह विनोदी एकपात्री कार्यक्रमांचे सादरीकरण त्या करतात. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन एकपात्री सादरीकरण करत आहेत. अत्यंत सोप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी आवाज जपणूक आणि संवर्धन यासाठीचे प्रशिक्षण त्या देतात.


Post a Comment

Designed By Blogger