भाजपची जादू कायम


फसलेली नोटबंदी व जीएसटी मुळे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरलेल्या भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील 101 ग्रॅपचायतींपैकी 78 ठिकाणी भाजपने यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी आपआपले गड राखले असले तारी त्यांना मोठे फेबद्दल करण्यात अपयश मिळाले आहे. जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या पेक्षा एकनाथ खडसे यांचीच जादू चालल्याचेही निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात रावेर तालुक्यातील ८ आणि बोदवड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले. या सर्व ग्रामपंचायतीत नेहमी प्रमाणे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात भाजपने मुसंडी मारली असून सर्व ग्रामपंचायतीत सरपंचपदासह बहुमतही मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला व शिवसेनेला एकाही ग्रामपंचायतीत खाते उघडता आलेले नाही. यावेळी सरपंच पदांसाठी सार्वत्रिक मतदान झाले होते, त्यात सर्वाधिक जागा भाजपने जिंकून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा संभाव्य कौल स्पष्ट केला आहे. मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगरसह रावेर व बोदवड तालुक्यात गेल्या तीन दशकात एकनाथराव खडसे यांचा ग्रामीण मतदारांवर प्रभाव राहिला आहे. यावेळी सुध्दा भाजपने सर्व जागा जिंकून प्रभाव सिध्द केला. याबाबत खडसे म्हणाले की, मुक्ताईनगरसह रावेर व बोदवड हा भाजपचा अभेद्य किल्ला आहे. गेल्या ३० वर्षांत या भागातील मतदार भिजपला कौल देत आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सहकार राज्य मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील 6 पैकी 5 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सरपंच निवडून आले आहेत, त्यात धार ग्राम पंचायत व सतत 5 वेळी भाजपचे वरचस्व कायम ठेवले आह. तसेच कल्याने खु ग्रामपंचायत, बोरगाव, खरदे, भामर्डी ग्रामपंचायत शिवसेने कडुन खेचून आणल्या आहेत,असे एकूण 5 ग्रामपंचायत भाजप ने वर्चस्वव सिद्ध केल़े. चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. जळगाव तालुक्यात भाजपाला धक्का बसला असून दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या एरंडोल तालुक्यात शिवसेनेने तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे.

Post a Comment

Designed By Blogger