बॉलीवूडमध्ये एखाद्या चित्रपटाचे मार्केटिंग करण्याचा ढाचा तयार झाला होता. मग तो चित्रपट यश चोपाडांचा असो, करण जोहरचा असो का आपल्या मराठमोळ्या नागनाथ मंजूळेंचा असो. सर्व चित्रपटांचे मार्केटिंग जवळपास एकाच प्रकारे होत असे. कॉमेडी नाइट विथ कपिल शर्मा, रोडीज, चला हवा येऊ द्या पासून सोनी, झी, कलर्स, स्टार आदि खाजगी दूरचित्र विहिण्यावर प्राईम टाईम मध्ये प्रसारित होणार्या सर्वच मालिकांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमीर खानसह सर्वच स्टार्सने हजेरी लावली आहे. येथे चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा फंडा वर्षानुवर्षं चालू आहे. अमीर खानने गर्दीत जाऊन सर्व सामान्याशी संवाद साधण्याचा पायंडा सुरू केला आहे. यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतो असा दिग्दर्शक व निर्मात्यांचा समज असल्याने हा पायंडा वर्षानुवर्षे सुरू आहे. आपण सोशल मीडिया बद्दल कितीही भरभरून बोलत असलो तरी, आतापर्यन्त एकही चित्रपटाचे मार्केटिंग शंभर टक्के डिजिटल पद्धतिने झाले नाही, हे मान्यच करायला हवे. मात्र ‘बाहुबली-२’ या चित्रपटाने डिजिटल मार्केटिंग कसं करावं? याबद्दल नवे पायंडे पाडले आहेत. प्रभास, अनुष्का, राजामौली किंवा अन्य कोणत्याही स्टारने एकाही शो मध्ये हजेरी न लावताही ‘बाहुबली-२’ ने अनेक विक्रम स्थापित केले. याचे श्रेय त्यांच्या मार्केटिंग टीमला द्यायला हवे. ‘बाहुबली’च्या मार्केटिंग टीमने डिजिटल मार्केटिंगचा मोठ्या खुबीने वापर केला. ‘बाहुबली’चा पहिला भाग आणि दुसरा भाग यांच्या प्रदर्शनात जवळपास दोन ते अडीच वर्षांचं अंतर आहे. या काळात ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं,’ हा प्रश्न सोशल मीडियावर सतत धुमाकूळ घालत राहिला. यामुळे ‘बाहुबली’च्या पहिल्या भागाचा ‘हाइप’ तसाच टिकून राहण्यास मदत झाली. याच वेळेस ‘बाहुबली 2’च्या सेटवरील काही फोटो लिक होऊन फेसबुक, व्हाट्सअपवर व्हायरल होत होते. याचं श्रेय चित्रपटाच्या डिजिटल मार्केटिंग टीमला जाते. ‘बाहुबली’च्या फेसबुकवरच्या ऑफिशिअल पेजला चाळीस लाखांच्या आसपास लाइक्स आहेत. ट्विटरवर त्यांना अडीच लाख लोक ‘फॉलो’ करतात आणि त्यांच्या यूट्युब चॅनेलला साडेचार लाख लोकांनी सबस्क्राइब केलं आहे. फेसबुकच्या ‘लाइव्ह व्हिडिओ’ सुविधेचासुद्धा वापर मोठ्या खुबीनं करून घेतला. ‘बाहुबली-२’चा ट्रेलर एक कोटीच्या आसपास लोकांनी बघितला. ‘ॲमेझॉन प्राइम’वर ‘बाहुबली- द लास्ट लिजंड्स’ नावाची ॲनिमेशन मालिकासुद्धा प्रदर्शित करण्यात आली॰ यामुळे चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित होण्याच्या आधीच बहुतांश प्रेक्षकांनी ‘बाहुबली-२’ बघायचा आहे, हे मनात नक्की केलं होतं. यातच ‘बाहुबली’च्या डिजिटल मार्केटिंगचं यश सामावलं आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून नरेंद्र मोदी देखील बाहुबली अर्थात पंतप्रधान झाले आहेत. यामुळे सोशल मीडियाचा वापर केवळ टाइमपास म्हणून न करता सकारात्मक वृत्तीने आपआपल्या क्षेत्रातील बाहुबली होण्यासाठी कारायला हवा.
जय माहेष्मती ..... सॉरी सॉरी .....जय फेसबुक, जय व्हाट्सअप.....जय ट्वीटर..... ________________________________________
Post a Comment