टेलीप्रॉम्पटरचा वापर करणे चुकिचे आहे का? यावर चर्चा करण्याआधी टेलीप्रॉम्पटरचा इतीहास व त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जाणारा वापर याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. लहानपणी दुरदर्शनवरील बातम्या पाहतांना बातम्या देणारा निवेदक किंवा देणारी निवेदिका सर्व बातम्या पाठ कशी करते हा प्रश्न नेहमी सतावत असे. नंतर कॉलेजला गेल्या नंतर कळले की त्यांच्या समोर टेलीप्रॉम्पटर ठेवलेला असतो. त्यावर दिसणार्या बातम्या ते वाचून दाखवतात!
टेलीप्रॉम्पटर म्हणचे पुर्वी छोटासा टिव्ही स्वरूपाचा एक इलेेट्रॉनिक डिव्हाईस असायचा त्यावर ठळक शब्दांमध्ये बातमी स्क्रोल (पुढे सरकत जाणे) होत असे. कालांतराने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले व सुरुवातील वृत्त निवेदकांसमोरील भला मोठा टेलीप्रॉम्पटर लहान आकारात राजकिय नेत्यांच्या भाषणावेळी पोडीयमवर आला. यावेळी टेलीप्रॉम्पटरचे स्वरुप पुर्णपणे बदलेले आहे. आता टेलीप्रॉम्पटर म्हणजे एक पारदर्शक आरसा स्वरुपातील एलसीडी मॉनिटर आहे. जो ४५ अंशांवर ठेवलेला असतो. त्यावर लिखीत भाषणाचे शब्द ५६ ते ७२ फॉन्टसाईजमध्ये भाषणकर्त्याला दिसतात. भाषणावेळी एक ऑपरेटर टेलीप्रॉम्पटरला नियंत्रित करतो म्हणजे भाषणकर्त्याचा बोलण्याचा वेग, पॉज आदींवर नियंत्रण ठेवतो. पारदर्शी असणारे हे टेलीप्रॉम्पटर पोडीयमच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर ठेवलेले असतात. यामुळे भाषणकर्ता त्यातून वाचून दाखवत असेल तरी समोरच्यांचा वाटते की वक्ता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्स्फुर्त भाषण करित आहे. यामुळे वक्त्याचे चांगले इंप्रेशन पडते व भाषणातील एकही मुद्दा सुटत किंवा चुकत नाही.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी टेलीप्रॉम्पटरचा आताच टेलीप्रॉम्पटरचा वापर केला असे नाही.सर्वप्रथम त्यांनी इस्त्रोमध्ये पीएसएलव्ही च्या प्रक्षेपणादरम्यान संशोधक व शास्त्रज्ञांसमोर केलेल्या भाषणावेळी टेलीप्रॉम्पटरचा वापर केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील भाषणावेळीही त्यांनी टेलीप्रॉम्पटरचा वापर केला होता. गुजरातमध्ये झालेल्या एका बिझनेस समिटला याचा वापर करत त्यांनी इंग्रजीतून भाषण केले होते. टेलीप्रॉम्पटरचा वापर केवळ नरेंद्र मोदीच करतात असे नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या छोट्याखानी भाषणांमध्ये टेलीप्रॉम्पटरचा नेहमी वापर करतात. यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, जापानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेतेही टेलीप्रॉम्पटरचा वापर करतात.
Post a Comment