गांधी तीर्थ मुळे बदलला भारताकडे पाहण्याचा कल



पद्मश्री स्व. भवरलालजी जैन यांच्या कार्याला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, 
इटली, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, दुबईसह अनेक देशांचा सलाम 

सुवर्णनगरी, केळी व कापसाचे माहेरघर, माजी राष्ट्रपतींचे गाव अशी वेगवेगळी ओळख असलेल्या जळगावला गांधी तीर्थमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात संपुर्ण भारतासह अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, अफगनिस्तान, दुबई, श्रीलंकासह अनेक देशातील नागरिकांनी गांधी तीर्थला भेट दिल्यानंतर ‘इनके्रडीबल इंडीया’ अशी प्रतिक्रीया व्यक्त केल्याची गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्हिजीटर डायरीमध्ये नोंद आहे. इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचारांची माहिती घेतल्यानंतर खुद्द ब्रिटनवासीयांनी अश्रु ढाळत गांधीजींना वंदन केली असल्याची नोंदही जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये आहे.

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री स्व. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतुन गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी केलेल्या कार्याची माहिती येणार्‍या पिढीला व्हावी या उद्देशाने भवरलालभाऊ यांनी शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीत सुमारे ८१ हजार चौ.फुट क्षेत्रफळावर भव्य अश्या गांधी तीर्थची स्थापना केली. यात गांधीजींनी वापरलेल्या वस्तुसह त्यांचे भव्य पुतळे, चरखा, त्यांच्या कार्याचा ऑडीओ-व्हीज्युअल माहितीपट आदी जीवनपटच साकरण्यात आला आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २५ मार्च २०१२ रोजी लोकार्पण झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या कानाकोपर्‍यातील भारतीयांसह जगभरातील परदेशी नागरिकांनीही  गांधी तीर्थला भेट दिली आहे.
व्हिजीटर डायरीमध्ये नोंदीत अमेरिकेचे डोग बर्ट म्हणतात, गांधी तीर्थची वास्तुच गांधीजींची व भारताची गौरवशाली परंपरा दाखवते. अमेरिकेचेच बोल केथ म्हणतात, हा प्रकल्पच येणार्‍या पिढीला पे्ररणादायी आहे. दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर एक व्यक्ती काय करू शकतो हे देखील यात मांडण्यात आले आहे. दुबईचे श्री. बेग म्हणतात, गांथी तीर्थ उभारण्याची संकल्पनाच कौतुकास्पद आहे. राष्ट्रपिताला वाहिलेली खरी श्रध्दांजली आहे. हे पाहिल्यानंतर माझा भारताबद्दलचा आदर अजून वाढला आहे. अफगनिस्तानचे के.बी.खान लिहीतात की, गांधीजींवर लिहीलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा गांधी तीर्थ वर अधिक माहिती आहे. हे म्युझियम उभारणारेच खरे गांधीवादी आहेत. मेक्सिकोचे फरनॅन्डो फेरारा यांची प्रतिक्रीया अत्यंत बोलकी आहे, ते म्हणतात, चांगले रचनात्मक कार्य करणे म्हणजे गांधीधर्म आहे. आपली क्षमता व मर्यादा न बघता प्रत्येकाने छोटे छोटे चांगले कार्य करावे याची प्रेरणा या भेटी मुळे नेहमी स्मरणात राहील. मलेशियाच्या श्रीदेवी नांबीयान म्हणतात की,  अत्यंत सुंदर असा हा अनुभव आहे. तरूण पिढीला ही सुंदर अशी भेट आहे. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेल्या संघर्षाची येथे पुर्ण माहिती मिळते. श्रीलंकेचे महेशन जयमोहन म्हणातात की, गांधीजींची महती श्रीलंकेला नवी नाही मात्र आजचा अनुभव वेगळाच होता. योग्य मार्गावर चालण्याची खरी प्रेरणा आज मिळाली. अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनिवासी भारतिय जानकी काकलमुडी म्हणातात की, देशभक्ती काय असते ते आज शिकायला मिळाले. भवरलालजींचा हा उपक्रम येणार्‍या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. नेब्रास्का युनिर्व्हसिटी, अमेरिकाची फाणी तेज अद्दीदाम व १७ विद्यार्थ्यांनी लिहीले आहे की, गांधी तीर्थची भेट आम्ही कधीही विसरणार नाही. गांधीजी खरे योध्दे होते मात्र त्यांची पध्दत वेगळी होती. गांधी रिसर्च फाऊंडेशनमुळे आम्हाला गांधीजींची खरी ओळख झाली. थायलंडच्या सायली काटेवाल म्हणतात की, मला गांधीजींबद्दल जास्त माहित नव्हते मात्र गांधी तीर्थला भेट दिल्यानंतर मी सर्व काही एका दिवसात शिकले याचा आनंद वाटतो.
डायरीतील प्रतिक्रिया 

मी पहिलेल्या गांधी म्युझियम पैकी गांधी तीर्थ हे सर्वोकृष्ट आहे. येथे भेट दिल्यानंतर तरूण मुलं नक्कीच प्रेरणा घेतील.
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती

आज माझ्या जीवनाचा विशेष असा प्रसंग आहे. मी मंतरलेल्या अनुभवातुन जात आहे. गांधी तीर्थ ही देशाला मिळालेली सर्वात सुंदर अशी भेट आहे.
   - डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ट शास्त्रज्ञ

गांधीजींना अपेक्षीत असलेल्या रामराज्याकडे पुढची पिढीच आपल्या देशाला व समाजाला घेवून जाईल. व याची प्रेरणा गांधी तीर्थपासून मिळेल.
   - डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ट अणु शास्त्रज्ञ

Post a Comment

Designed By Blogger