७५ हजार घरांमध्ये पोहचणारे नवजीवन सुपरशॉप

मुंबई, दिल्ली, बंगरूळ, अहमदाबाद सारख्या मेट्रो  शहरांपर्यंत मर्यादित असणारी ग्राहकसेवेची तत्वे जळगाव शहरामध्ये प्रथमच आणून रूजविण्यामध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते ते नवजीवन सुपर शॉपचे! ९० च्या दशकात जेंव्हा किराणा दुकान व त्या समोर लागणार्‍या ग्राहकांच्या रांगा, असे चित्र जळगाव शहरात सर्वत्र दिसत असतांना थेट दुकानात शिरून किराणामाल आपल्या हाताने निवडून व पारखून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यासह घरपोच सेवा, धान्य निवडून देणे, दर्जेदार मालाचे पॅकेजिंग करून देणे, शुध्द सुटे तेल मशिनी प्रक्रियेव्दारे विक्री करणे यासारखे नाविन्यपुर्ण प्रयोग करण्यात नवजीवन सुपरशॉपी पायोनियर मानली जाते. जळगाव व पाचोरा शहरामधील पाच शाखांच्या माध्यमातून दरमहिन्याला सुमारे ७५ हजार ग्राहकांना सेवा देत असतांना आता अत्याधुनिक सेवा सुविधांसह मानराज पार्क परिसरातील सहा हजार स्केअर फुट अशा भव्य जागेत नवजीवन मेगा मार्टचा शुभारंभ झाला. या पार्श्वभूमीवर नवजीवनचे संचालक अनिलभाई कांकरीया यांच्याशी केलेली बातचीत...!

गेल्या ७० वर्षांपासून आमचा ग्रोसरीचा पिढीजात व्यवसाय सुरू आहे साधारणत: ५१ वर्षांपुर्वी वडील व काकांनी नवजीवनची पायाभरणी केली. नवजीवन म्हणजे ग्राहकांचा विश्‍वास व प्रामाणिक सेवा असे समिकरणच बनले. या काळात मॉल किंवा मार्ट सोडाच परंतू सुपरशॉपी ही संकल्पना आपल्याकडील भागांमध्ये पोहचली नव्हती. दुकानाच्या काउंटरवर होणार्‍या प्रचंड गर्दीमुळे आमच्या ग्राहकांना दोन-दोन तास वाट पहावी लागायची. याचे आम्हाला खुप वाईट वाटायचे याचा पुर्ण अभ्यास केल्यानंतर  नवजीवन सुपरशॉपीचा जन्म झाल्याचे अनिलभाई कांकरीया यांनी सांगितले. सन १९९३ मध्ये  मोठे भाऊ कांतिलालशेठ कांकरीया व लहान बंधु सुनिलभाई कांकरीया यांच्यासोबत नवीपेठेत नवजीवन सेल्फ सर्व्हिसचा श्रीगणेश: झाला या काळात सुपरशॉपी ही संकल्पना अगदी नवी असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती मात्र यासोबत आमचे वडील व काकांनी निर्माण केलेली विश्‍वासहार्यताही असल्याने हा नवा व धाडसी प्रयोग यशस्वी झाल्याचे श्री. कांकरीया म्हणाले. यानंतर सन २००६ मध्ये बहिणाबाई उद्यानाजवळ, सन २००७ मध्ये नवीन बस स्थानकाजवळ, सन २०११ मध्ये महाबळ व सन २०१२ मध्ये पाचोरा शहरात सुशिल डेअरीजवळ नवजीवन सुपरशॉपी ग्राहकसेवेकरीता पोहचली. आता सन २०१५ मध्ये मानराजपार्क मध्ये मेगा मार्टचा शुभारंभ होत आहे. या यशस्वी घोडदौडीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जळगावातील ग्राहकांना जे पाहिजे ते सर्वात आधी आम्ही उपलब्ध करून देतो, रिटेलींग एक इंडस्ट्र्र्री आहे. आजच्या सहा महिन्यांनंतर ग्राहकांना काय लागेल याचा अभ्यास व संशोधन करावा लागतो आणि याच गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देतो. ग्राहक हा आमचा केंद्र बिंदु असतो. आजकाल बायस मार्केटींगचा जमाना आहे. आधी एक पोते माल आणायचा व त्याचे १०० पॅकेट करून विकायचे हे रिटेलींगचे सुत्र आता पुर्णपणे बदलले आहे. आता ग्राहकांच्या आवडी-निवडी बदलत आहेत. जाती, धर्म, सण, समारंभ यांचाही अभ्यास करावा लागतो, यामुळे ग्राहकांना नेमक्या कोणत्यावेळी काय लागते? हे समजते व आम्ही ते उपलब्ध करून देतो.  या नाविन्यपुर्ण बदलांमध्ये नवजीवन परिवारातील तिसर्‍या पिढीचा मोठा वाटा असल्याचे सांगत आमची मुलं आमच्या सोबत बसतांना टेक्नोसॅव्ही पध्दतीचा वापर करतात. यात कमलेश कांकरीया व सुमित कांकरीया या दोघांचे एमबीए झाले आहे. संमकित कांकरीया या देखील एमबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे तर आकाश कांकरीया हा सीए असून आता युपीएससीची तयारी करत असल्याचेही त्यांनी नमुद केले. या सर्व यशस्वी वाटचालीत संपुर्ण कुटूंबियांसोबत कर्मचारी वर्गाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून नमुद केले. गुणवत्तेत कधीही तडजोड न करणार्‍या ग्राहकांच्या कसोटीवर पुर्णपणे खर्‍या उतरणार्‍या नवजीवन सुपरशॉपीच्या मानराज पार्कमधील नव्या अत्याधुनिक शाखेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger