पैशांच्या घोटाळ्यापासून विचारांच्या घोटाळ्यापर्यंत!


आपण मॅच फिक्सींग बद्दल नेहमीच एकतो किंवा वाचतो मात्र आज मी तुम्हाला सर्च फिक्सिंगची माहिती देणार आहे. आपल्या भारतात घोटाळा हा शब्द नवा नाही. कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांच्या सुरस कथा आपण ऐकत आलो आहोत किंबहून दररोज ऐकतच आहोत. मात्र आजवरचे सर्व घोटाळ्यांमध्ये कोट्यावधी रुपये, जमीनी, सोने आदींची मुल्यवान वस्तुंची देवाण-घेवाण झाली. परंतू आज आपण जगातील सर्वात मोठ्या घोटाळ्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यात पैशांची नव्हे तर आपल्या विचारांशी हेराफेरी झाली आहे. दचकु नका हे खरे आहे...जगातील सर्वात मोठे सर्च इंजिंन असलेले गूगल आपल्या विचारांना प्रभावित करुन फसवणूक करते व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कमाई करते. गूगलमुळे जगातिल कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने आपले जीवन सुकर झाले आहे असे म्हटले जाते, मात्र हेच गूगल आता आपल्या विचारांशी व्यवहार करु लागले आहे. गूगलचा हा घोटाळा पेैशांचा नसून विचारांचा आहे.

२१ व्या शतकात माहिती ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. माहिती विकून कोट्यावधी रुपयांची कमाई केली जावू शकते, हे यावर सहजासहजी विश्‍वास ठेवणार नाही. मात्र जगातिल सर्वात मोठे इंटरनेट सर्च इंजिन असलेल्या गूगलने माहिती विकून आपले साम्राज्य उभे केले आहे. इतकेच नव्हे तर आपण नियमित वापरत असलेले फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्टिटर देखील आपणास फुकट सेवा देत असले तरी ते आपली माहिती गोळाकऊन ते विकत आहेत. आपण आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड किंवा आयओस मोबोईलवर कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करतांना आपल्या कडून मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबर, फोटोग्राफ्ससह अन्य माहिती शेअर करण्याची परवानगी मागितली जाते व आपण आय अ‍ॅग्री या बटनावर क्लीककरुन पुढे जातो. ही माहिती गुगलच्या तिजोरीत बंद होते. गूगल हे जगातिल सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपण आपल्या कॉप्युटरवर जी कोणतीही माहिती शोधतो त्याची माहिती गूगलकडे जाते. त्यानुसार गूगल आपल्या काही गोष्टी रेकमेंड करतो. उदाहरण द्यायचे म्हटल्या आपण फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉन सारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर एखाद्या वस्तुचा शोध घेतला असल्यास आपण इंटरनेट वापर करतांना कोणत्याही वेबसाईटवर असला तरी एखाद्या कोपर्‍यात त्या प्रॉडक्टस्च्या जाहिराती सुरु असतात.

आपणास कोणत्याही माहितीची गरज भासल्यास आपण सर्वात आधी गुगल सर्च करतो. इतकेच काय तर इंटरनेट सुरु आहे कि नाही? हे तपासण्यासाठी देखील आपण वेब ब्राऊझरमध्ये गूगलच टाकतो. एका अहवालानुसार गूगलकडे एका सेकंदात सुमारे ४० लाख प्रश्‍नांची माहिती सर्च इंजिनच्या माध्यमातून विचारली जात असते. कारण कोणताही निर्णय घेण्याआधी आपण गूगल सर्च करतो! गूगलवर उपलब्ध होणार्‍या माहितीमुळे आपली फसवणूक होणार नाही, असा आपला समज असतो. गूगलवरील माहितीने प्रभावित होवून आपण निर्णय घेत असतो मात्र आता गूगलच आपली फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. गूगल सर्चच्या माध्यमातून वापरकर्त्यापर्यंत प्रामाणिकपणे माहिती पोहचविली जात नसल्याचे उघड झाल्याने युरोपियन युनियन कमिशनने गूगलवर तब्बल १७ हजार ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गूगल सर्च चा रिझल्ट आधीच फिक्स करुन केवळ गूगलशी संबंधित कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहचवली जात असल्याचा ठपका गूगलवर युरोपिय युनियनने ठेवला आहे. गूगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये फेरफार करुन त्याचा गैरवापर केल्याचे युरोपिय युनियनचे म्हणणे आहे. आपल्या विचाराशी निगडीत या घोटाळ्याबाबत थोडेसे इतिहासात डोकावणे आवश्यक आहे. सन २००४ मध्ये गूगलने युरोपात स्वस्त खरेदी करण्यासाठी फ्रोगल नावाचे एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यात काही सुधारणा करुन २००८ मध्ये त्याचे नाव बदलून गूगल प्रॉडक्ट सर्च असे करण्यात आले. त्यानंतर २०१३ पासून त्यास गूगल शॉपिंग या नावाने ओळखले जावू लागले. मात्र याचा वापर गूगलने केवळ आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी केला. यामुळे वापरकर्त्यांची शुध्द फसवणूक झाली. कारण आपणास एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास ती कोठे मिळेल? चांगला ब्राण्ड कोणता? स्वस्त कुठे आहे. अशा पध्दतीची माहिती आपण गूगलवर सर्च करतो व आधी जी समोर येईल त्यावर विश्‍वास ठेवतो. मात्र गूगल सर्च करतांना गूगल शॉपिंगशी निगडीत कंपन्यांचीच माहिती सर्वात वर दिली जाते व प्रतिस्पर्धी कंपन्यांचे उत्पादन कितीही दर्जेदार असले तरी त्याची माहिती सर्वात खाली दिली जाते. त्यामुळे आपण माहिती सर्च केल्यानंतर सहसा पहिल्या पानावर येणार्‍या लिंकवर क्लिक करून माहिती घेतो. वापरकर्ता सहसा दुसर्‍या किंवा तिसर्‍या पानावर जात नाही. अशा प्रकारे गूगल आपल्याच उत्पादनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवून आपल्या विचारांना प्रभावित करतो. याचा थेट फायदा गूगलशी निगडीत कंपन्यांना होतो. युरोपियन युनियनच्या माहितीनुसार, गूगलच्या शॉपिंग सर्व्हिसचा टॅफिक मोठ्याप्रमाणात वाढता तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा कमी झाला. याचा सरळ अर्थ होतो कि, गूगलवर कोणतीही माहिती विचारल्यानंतर त्याची माहिती प्रामाणितपणे न येता स्वत:च्या फायद्यासाठी वापरकर्त्यांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने गूगलला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीने ५० हजार लोकांच्या इंटरनेट हिस्ट्रीवर संशोधन केले. जे लोक नियमितपणे ऑनलाईन वृत्तपत्र वाचतात त्यांच्या आवडी निवडीवर सखोल संशोधन करण्यात आले. वाचकला कोणत्या प्रकारच्या बातम्या वाचायला आवडतात, हे अभ्यासण्यात आले. या संशोधनात असे लक्षात आले की, गूगल सर्च इंजिन व फेसबूकची न्यूजफिड आपल्या वापरकर्त्यांला त्याच बातम्या दाखवतात ज्या त्याला आधीपासूनच आवडत असतात किंवा वाचकावर त्या बाबींचा प्रभाव असतो. हे प्रथमदर्शन काहीच चुकिचे वाटत नसले तरी यामुळे त्या विषयाची एकच बाजू वाचकासमोर येत असते. याचे समर्पक असे उदाहरण द्यायचे म्हटल्यास, जर आपण नरेंद्र मोदी यांचे समर्थक असाल तर मोदींशी निगडीत चांगल्या बातम्याच समोर येतील व विरोधक असाल तर केवळ नकारात्मक बातम्या समोर येतील. या प्रकारामुळे आपणास कोणत्याही विषयासंबधी अर्धवट माहिती मिळते व आपण त्यावर आपले मत निश्‍चित करतो. ज्या सोशल मीडियाच्या लाटेवर स्वार होवून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले तोच सोशल मीडिया आता भाजपाची व मोदींची डोकंदुखी ठरु लागला आहे.

पुर्वीच्या काळी लोक वृत्तपत्र वाचून आपले मत निश्‍चित करत होते. त्यानंतर २४ तास बातम्या देणार्‍या वाहिन्या सुरु झाल्या मग टिव्हीचे रिमोट हातात घेवून आपण वेगवेगळे चॅनल्स् बदलून माहिती घेवू लागलो. सर्वांचे ऐकून घतल्यानंतर आपले मत तयार करु लागलो. मात्र आता इंटरनेटचे युग आले आहे. आता आपल्या कडे गूगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्टीटर आहेत. त्यावर कोणत्याही माहितीला लाईक केल्यानंतर त्यानुसार तुमच्या आवडी निवडी निश्‍चित केल्या जातात व नंतर त्यासंबधित माहिती तुमच्यापर्यंत पोहचवली जाते. ही माहिती जाहिराती, व्हिडीओ, टेक्स्ट मेसेज आदींच्या स्वरुपात असते. यामुळे त्या संबधीच्या माहितीचा आपल्यावर भडीमार केला जातो व आपण दुसरी बाजू समजून न घेता आपले मत तयार करतो. या विषयावर आता अनेक पाश्‍चिमात्य देशांमध्ये संशोधन सुरु झाले आहे. हा एक वैचारिक घोटाळा करण्याचाच प्रकार आहे, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger