पाचोरा येथे शिवसेनेचे संजय गोहील, धरणगाव येथे शिवसेनेचे सलिम पटेल, यावल येथे शिवसेनेच्या सुरेखा कोळी, फैजपूर येथे भाजपाच्या महानंदा होले, अमळनेर न.पा.मध्ये शविआच्या पुष्पलता पाटील, चोपडा येथे शविआच्या मनिषा चौधरी, पारोळा येथे भाजपाचे करण पवार, एरंडोल येथे भाजपाचे रमेश परदेशी, चाळीसगाव येथे भाजपच्या आशालता चव्हाण, सावदा येथे भाजपच्या अनिता येवले, यावल येथे शिवसेच्या सुरेखा कोळी, रावेर येथे जनक्रांतीचे दारा मोहम्मद यांनी पदभार स्विकारला. भुसावळचे रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर शासकिय कामाने मुंबई येथे गेले असल्याने दि.३० रोजी पदग्रहण सोहळा घेण्यात येणार आहे.
आज नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंद व उत्साह ओेसांडून वाहत असला तरी आगामी पाच वर्षात अनेक अडथड्यांची शर्यत पार पाडावी लागणार असल्याची जाणीव चार नवनिर्वाचित नगराध्यक्षांना नक्कीच झाली आहे.
पारोळा येथे भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी सुत्रे ताब्यात घेतली असली तरी एकूण २१ पैकी भाजपाचे केवळ ७ सदस्य आहेत तर शिवसेनेचे ५ शविआच्या ७ जणांनी विरोधी बाकांवर बसण्याचे जाहीर केले आहे. चाळीसगाव नगरपालिकेत भाजपाच्या आशालता चव्हाण यांच्या हाती सत्ता असली तरी पालिकेत एकूण ३४ पैकी भाजपाकडे केवळ १३ जागा आहेत तर आघाडीकडे १७ व शिवसेनेकडे २ जागा आहेत. पाचोरा येथेही शिवसेनेचे संजय गोहील यांच्याकडे सेनेचे ११ सदस्यांचे संख्याबळ आहे. तर राष्ट्रवादीचे ७ व जनक्रांती आघाडीचे ८ सदस्य विरोधात बसणार आहेत. फैजपूरात भाजपाच्या महानंदा होले यांच्याकडे भाजपाचे केवळ ५ सदस्यांचे संख्याबळ आहे तर विरोधी बाकांवर राष्ट्रवादीचे ४ व अपक्ष ४ नगरसेवक राहणार आहेत.
Post a Comment