देशाचा सुवर्ण चौकोन पालथा घालणारा ध्येयवेडा साहसी डॉक्टर !

साडेतिन वर्षापुर्वी आजारपणात कोमात गेलेला ५३ वर्षीय व्यक्ती पुर्णपणे बरा होण्यासाठी (शाररिकच नव्हे तर मानसिकदृष्टीनेही) केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर १३ हजार ८३५ कि.मी. कार चालवून अवघ्या २६ दिवसात पुर्ण भारताला गवसणी घालून लिम्का बुक ऑफ रेकॉड्सला दखल घ्यायला लावू शकतो, हे जळगावच्या डॉ. सुनिलदत्त चौधरी यांनी दाखवून दिले आहे.

जळगावचे सुपुत्र डॉ. सुनिलदत्त चौधरी यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी स्वत:च्या कारने कन्याकुमारी ते कन्याकुमारी असा १३ हजार ८३५ किमी प्रवास करत संपुर्ण भारताला गवसणी घातली आहे. त्यांच्या या अद्भुत सहसाची लिम्क बुक ऑफ रेकॉर्डने सलग दुसर्‍यांदा दखल घेतली आहे. कारने केवळ २६ दिवसात भारताच्या चारही दिशा पालथे घालणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

डॉ.चौधरी यांचा जीवन प्रवासच थरारक आहे. एमडी होमिओपॅथी प्रमाणपत्र मिळवलेल्या भारतातील पहिल्या १२ डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी जगभरातील रुग्णांची तपासणी केली असून गुंतागुंतीची प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. सकाळी ९ वाजेपासून पहाटे ४ वाजे पर्यंत त्यांनी रूग्ण सेवा केल्याचे अनेक जण सांगतात. कितीही मोठी कामगिरी केली तरी प्रसिध्दीपासून दूर राहणारे डॉक्टर रूग्णसेवा वगळता कधी सामाजिक जीवनात रूळलेच नाही! शहरातील रस्त्यांवर पत्नीसोबतही फिरतांना त्यांना कोणी पाहिले नाही, असे त्यांचे जवळचे मित्र गमतीने म्हणतात. मात्र डॉ.संजयदत्त चौधरी हे साडेतिन महिन्यांपुर्वी अचानक आजारी पडले. उपचार सुरू असतांना सहा दिवस कोमातही गेले. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना शुध्दीवर आणल्यानंतरही औषधांचा त्यांच्यावर फारसा फरक पडत नव्हता. कारन ते शाररिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही अपंग झाले होते. त्यांची ही अवस्था त्यांचा लहान मुलगा रामकृष्ण निमुटपणे पाहत होता. आपले बाबा साहसी असून आज इतके असहाय्य का झालेत? हा प्रश्‍न त्याच्या मनाला सारखा बोचत होता. कारन तो डॉक्टरांच्या पाच वर्षापुर्वीच्या साहसी मोहिमेचा साक्षीदारही होता.

डॉ.चौधरी हे व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना चारचाकी गाडी चालवण्याचे प्रचंड वेड होते. ५ वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिण टोकाकडून ड्रायव्हिंग करून उत्तर टोक गाठणारे म्हणून यापूर्वीच त्यांची प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. २२ मे २००९ ते २८ मे २००९ दरम्यान ६ दिवस - ५ तास २५ मिनिटांमध्ये कन्याकुमारी ते लेह असा ३,८४७ किमीचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रमही डॉ.चौधरींच्या नावावर आहे. परंतु इतका साहसी व्यक्ती अंथरूणाला खिळला आहे, ही वस्तुस्थीती मानायला रामकृष्ण तयार नव्हता! एके दिवस तो म्हणाला, बाबा मला तुमची लाज वाटते, तुम्ही काही तरी वेगळं करून दाखवा तरच मी तुम्हाला मानेल... असे चॅलेंज त्यानेे देवून टाकले. मुलाच्या इच्छेखातर आपण इतकेही करू शकत नाही का? हे शल्य मनाला बोचत असतांना डॉ. चौधरीनी आपला पुर्वीचा विक्रम मोडून काढत कारने देशाचा सुवर्ण चौकोन पालथा घालण्याची योजना आखली. मी हे करून दाखवेलच असा आत्मविश्‍वास असल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्ग निश्‍चित केला. आपल्या आधीच ३० हजार किमी.चा प्रवास करणार्‍या मारूती सुझुकी एसएक्स ४ गाडीवर जीपीएस सिस्टम बसवून डॉ.चौधरी यांनी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२० ला कन्याकुमारीहून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. अरुणाचल प्रदेश येथील तेझुमध्ये ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० ला पोहोचले. त्यांनी अंदाजे ४२८४ किमीचा प्रवास पूर्ण केला. तांगी फॉरेस्टच्या दुर्गम भागात केवळ १० तास आराम केला. कन्याकुमारी ते तेझु प्रवासात ६८ किमी दिशेने भुवनेश्वरला त्यांना मोठ्या बिघाडाचा सामना करावा लागला. त्यांना असा अनुभव ओरिसा, बंगाल आणि अरुणाचल प्रदेश येथेही आला. त्यांची कार ८०/प्रती तास वेगाने धावत नव्हती. त्यामुळे गाडीचे इंजिन थंड करण्यासाठी त्यांना काही वेळा थांबावे लागले. तेझुपासून ४१४७ किमी ड्रायव्हिंग करून १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ते लेहला पोहोचले. त्यानंतर लेहपासून २६४९ किमीचा पल्ला पार करून ते २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.२० गुजरात येथील नारायण सरोवर पूर्वीचे कोटेश्वर येथे आले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता २७५५ किमीचा प्रवास करून त्यांनी कन्याकुमारी गाठली. यात ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रातुन जाणारा राष्ट्रय महामार्ग, निर्जन रस्ते, आतंकवाद्यांचे सावट, भिन्न-भिन्न भाषा अश्या असंख्य अडचणींवरही मात केली. डॉ. चौधरी यांनी २५ दिवसांत १३८३५ किमीचा टप्पा पार केला. त्यांनी ५५३ किमी प्रती दिवसच्या सरासरीने ड्रायव्हिंग करून प्रवास पूर्ण केला. भारताच्या चारही दिशांना गवसणी घालून त्यांनी आपले स्वप्न अशारितीने पूर्ण केले. आपल्या मुलाचे (रामकृष्ण) स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताच्या चारही कोपर्‍यांची सफर केली. मात्र हा प्रवास प्रचंड आव्हानांनी भरला होता हे त्यांनी मान्य केले. भारताचे चार कोपरे पादाक्रांत करून इतिहास रचणारा मी पहिला भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. भारत हा विलोभनीय देश असून इथे भौगोलिक विविधता आढळते. काही प्रमाणात अडथळे असूनही मी माझा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. मला जगासमोर एक उदाहरण निर्माण करायचे आहे. मी माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाचा पूर्ण आनंद घेत आहे. मी आयुष्याकडे एक आव्हान आणि साहस म्हणून पाहतो, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.जळगावच्या मातीचे नाव पुन्हा एकदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले जात आहेत आहे, याचाही आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ५३ वर्षाच्या या तरूणाने जीवन कसे जगावे याचा आदर्श इतरांसमोर घालून दिला आहे. अश्या या साहसी ध्येयवेड्यास सलाम! 

Post a Comment

Designed By Blogger