जळगाव जिल्ह्याचा ‘आदर्श’ घोटाळा
आडगांव येथील हुतात्मा स्मारकाच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार
आदर्श घोटाळ्यात शहीदांची घरे लाटण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्याची मान शरमेने झुकली होती. जळगाव जिल्ह्यातील असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून एरंडोल तालुक्यातील मौजे आडगाव येथील हुतात्मा स्मारकांच्या बांधकामात लाखो रुपयंाचा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघडकीस आले आहे.
आडगाव येथील हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्ती व इतर बांधकामासाठी शासनातर्फे सन २०१२-१३ मध्ये ६० लाख रुपयंाचा निधी मंजूर करण्यात आला होता. याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ५८ लाख २० हजार ४७४ रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. यानुसार काम सुरु केल्यानंतर यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून काम न करता परस्पर पैसे काढून घेतल्याचे समोर आले आहे. मात्र यासाठी ज्येष्ठ नागरिकांनाही दोन वेळा उपोषणाला बसावे लागले, हे दुर्दव्य!
हा गैरप्रकार समोर आणण्यासाठी शांताराम पवार(वय ६५) यांनी सन २०१५ पासून लढा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या समवेत संतोष पाटील(वय ६६), मोहनदास महाजन(वय ७०), महारू महाजन(वय ६४), रमेश मुसाडे(वय ६२), लक्ष्मण भुसारी(वय ६४), लहु मालचे(वय ६२), दौलत पाटील(वय ६०) या ज्येष्ठ नागरीकांचीही सहभाग होता. सुरुवातीला त्यांची दखल देखील घेण्यात आली नाही. मात्र जिल्ह्याचा ‘आदर्श’...
त्यांच्या अंगात स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त असल्याने हार न मानता त्यांनी आपला लढा नेटाने सुरु ठेवला. शासनदरबारी चपला झिजविल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चौकशी समिती नेमून या गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात आली. यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. स्मारकासारख्या पवित्र स्थानावरही गैर व्यवहार करून शहीदांचा अपमान करणार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकार्यांनी केली आहे.
चौकशी अहवालात धक्कादायक बाबी उघड
सार्वजनिक बांधकाम विभाग व त्रयस्थ समितीच्या पथकाने स्वतंत्ररित्या केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत.यात प्रामुख्याने ऍप्रोच रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ प्रतिचे आहे.यासाठी वापरलेली खडी फारच निकृष्ठ आहे. सर्व काम तांत्रिक दृष्ट्या अयोग्य आहे. रस्त्याची जाडी मोजमाप पुस्तकानुसार नाही. कॉलमी बीमच्या वापरात येणारा कॉक्रीट प्रमाणाचे कॉक्रीट रोडसाठी वापरात घेतले आहे.कोटा फरशी बसविण्याच्या कामात गैरप्रकार झाला आहे. रंगकामातही मोठी अनियमितता आहे. मेटलची कामेही चुकीच्या पध्दतीने करण्यात आले आहे. निविदेमधील अटी, शर्ती व अंकाऊटचे उल्लंघन करून अंंतिम बिल अदा करण्यात आल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
मंजूर ६० लाखांमध्ये करावयाची कामे
यामध्ये हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण करणे, स्मारकासाठी आरसीसी आवार भितींचे बांधकाम करणे, स्मारकासाठी ऍप्रोच रस्त्याचे बांधकाम करणे आदी कामांचा समावेश होता. नुतनीकरणामध्ये बाहेरून प्लॉस्टर करणे, छतास मेटाकलर शिट बसविणे, जुनी फरशी काढून त्याठिकाणी नवीन फरशी बसविणे, सिलींगच्या लोंखडीकामास कलरिंग करणे, नविन लोंखडी दरवाजे बसविणे, नविन लाकडी फ्रेम बसवून फ्लश डोअर बसविणे, हुतात्मा स्मारकाच्या आजुबाजूला आरसीसी पध्दतीने संरक्षक भितींचे बांधकाम करून त्यावर लोंखडी ग्रील बसविणे, पोचरस्त्यासाठी १५० मीटर लांबीच्या खडीकरणाचे काम दोन थरात करणे आदी बाबींचा समावेश होता.
Post a Comment