रावेर लोकसभा मतदार संघासाठी 600 कोटींचा निधी


बोदवड सिंचन योजनेसाठी 500 कोटींचा निधी... मेगा रिचार्ज प्रोजेक्टचा सर्व्हे... स्थानिक विकास कामांसाठी 4 कोटींचा निधी... केळीची बंद पडलेली एक्सपोर्ट पुर्ववत सुरू...भुसावळ -मुंबईसाठी नवीन एक्सपे्रस, लांबपल्याच्या गाड्यांना थांबा व वाढीव बोग्या, केळी वाहतुकीसाठी स्वतंत्र वॅगन यासह विविध विकास कामांचा शुभारंभ हेच आपल्या वर्षभरातील कार्याची पावती आहे, अशी भावना रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्ष पुर्ण होत आहे. यापार्श्‍वभुमीवर ‘मोदी सरकार’ व त्यांच्या जिल्ह्यातील शिलेदार खा.रक्षा खडसे वार्षिक प्रगती पुस्तक सादर करतांना म्हणाल्या की, ‘अच्छे दिन’ चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला होता, त्याची सुरूवात झाली आहे. या विषयावर विरोधक कितीही राजकारण करत असले तरी, आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या परदेशी दौर्‍यांमुळे विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही गुंतवणूक वाढली की उद्योगदधंदे वाढतील व उद्योग वाढले की रोजगार वाढतील व आपोआपच सर्वसामान्यांनाही अच्छे दिन येतील. परंतु या प्रक्रियेला वेळ लागेल. वर्षभरात मोदीसाहेबांनी विविध देशांना भेटी दिल्या तेथे प्रत्येक ठिकाणी मोठं-मोठे करार झाले हे ‘मेक इन इंडीया’साठी फायदेशीर आहेत. शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजनेसह विकास योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र वर्षभर गारपीट, वादळ, अवकाळी पाऊस व आता भुकंप असा निर्सगाचा प्रकोप सुरूच आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने काही मर्यादा येत आहे, असेही खा.खडसे यांनी स्पष्ट केले.

रावेर लोकसभा मतदार संघात केलेल्या कामांवरही समाधान व्यक्त करत त्या म्हणाल्या की, शेतकरी, व्यापारी, उद्योजकांसह सर्वसामान्यांचे रखडलेले प्र्रश्‍न मार्गी लावण्यात येत असून आतापर्यंत 600 कोटींपर्यंतचा निधी मतदारसंघात आला आहे. ही तर केवळ सुरूवात आहे. आगामी काळात हा मतदार संघ संपुर्ण देशासाठी ‘मॉडेल’ ठरेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यात प्रामुख्याने, भुसावळ-मुंबई स्पेशल ट्रेनसाठी पाठपुरावा भुसावळ-दादर सुपरफास्ट एक्सप्रेस विकली ट्रेन सुरु, मुंबई-अमरावती, नागपुर-मुंबई मार्गावरील अति महत्वाची समजली जाणारी गाडीसाठी वाढीव पाच बोग्या, दादर-अमृतसर ही गाडी सीआयटीएम टर्मिनलहून सुटणार, भुसावळ डिव्हीजन सेंट्रल रेल्वे या मेन लाईन वरील काही गावांना जोडणारे रेल्वे नेट फक्त 12 तास कार्यरत होते ते आता 24 तास रेल्वे गेट उघडण्यासाठी मनुष्यबळ तैनात, वरणगाव येथील केंद्रीय विद्यालयांसाठी 1 ली साठी वाढीव तुकडी मंजूर करुन  केंद्र सरकारने मान्यता दिली, वरणगाव व भुसावळ ऑर्डीनन्स फॅक्टरी येथील भरतीसाठी स्थानिक लोकांना प्राधान्यासाठी संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा, श्री.पटीकर साहेबांनी स्थानिकांना प्राधान्यासाठी कोटा ठरवून देण्याचे आश्‍वासन देत येत्या काही महिन्यात घोषणा, केंद्रीय सीआरएफ फंडातून अंकलेश्‍वर-बुराहनपुर रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर तसेच जामनेर-भुसावळ रस्त्यासाठी तरतुद, मतदार संघातील इतर कामासाठी एक वर्षात 10 कोटीपेक्षा जास्त निधी सीआरएफ फंडातुन मंजूर, मतदार संघात तसेच जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासाठी अपंगाना मदत म्हणून साहित्य मिळण्यासाठी सतत पाठपुरावा साहित्य एक महिन्यात उपलब्ध करुन देणार, जळगाव जिल्ह्यासाठी महिलाच्या बचत गटानी बनविलेल्या उत्पादन विक्रीसाठी 4 दिवसांचा जळगाव येथे भव्य मेळावा, बोदवड सिंचन योजनेसाठी 500 कोटी रुपये मंजूर त्यातील 200 कोटी येत्या वर्षाभरात मिळणार पहिला हप्ता 66 कोटी महाराष्ट्र सरकारकडे वर्ग, सातपुडा पर्वत ते तापी खोरे यातील भुजल पातळी वाढविण्यासाठी मेगा रिर्चाज प्रोजेक्टसाठी सर्व्हेसाठी केंद्राकडून निधी मंजूर, टास्क फोर्स कमिटी मंडळ केल्यामुळे प्रोजेक्टचे पुढील काम करीत कार्यान्वित होण्यास भरीव मदत,  भुसावळ येथील सागरी चाच्याकडून ओलीस ठेवलेल्या युवकांची विदेश मंत्रालय तसेच शिंपीग मंत्रालयात तातडीने अ‍ॅक्शनसाठी प्रयत्न व त्यामुळे 3-4 दिवशीच सुखरूप भुसावळ येेथे घरी सुखरुप परत, स्थानिक कामांसाठी राज्य सरकारकडून 4 कोटीचा निधी कामांना सुरुवात व त्यातील बहुताश: पुर्ण, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या जिमॅस्टीक खेळाडूसाठी व त्यांच्या जागतिक खेळ स्पर्धासाठी पाठपुरावा, व त्यामुळे हा खेळाडू भारतासाठी एशियन गेम्स किंवा ऑलंपिकसाठी पात्र ठरल्यास महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या पुढील सरावासाठी रु. 5 लाखाचे अनुदान देण्यास मान्यता,  पाकिस्तान बार्डर येथून घेणारी केळी एक्सपोर्ट अचानक बंद केल्यामुळे केळी व्यापार्‍यांचे नुकसान होताच तातडीने कृषीमंत्री तसेच वित्तमंत्री यांना भेटून एक्सपोर्ट एक दिवसात पुर्ववत करण्यात यश, नदी तोड प्रकल्पा अतंर्गत नदी जोड कार्यक्रमांची मागणी (तापी-नर्मदा), केळी व कापसावर प्रक्रीया करणारे उद्योग कसे सुरू करता येतील, यादृष्टीने अभ्यास सुरू आहे. कारण आपल्या मालाला आंतरराष्ट्रीय मार्केट कसे मिळेल यास प्राधान्य देण्यात येत आहे. लघु उद्योगांना मिळणारे आर्थिक अनुदान कमी आहे त्याची मर्यादा वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. रेल्वे विकत असलेल्या बाटलीबंद पाण्याचा निर हा प्रकल्प भुसावळमध्ये सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही खा.रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

संसदेत 76 टक्के उपस्थिती

संसदेच्या अहवालानुसार वर्षभरात झालेल्या संसदेच्या सत्रांमध्ये खा. खडसे यांची 76 टक्के उपस्थिती आहे. जुन 2014 मध्ये त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त केले. जुलै-ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या दुसर्‍या सत्रात आठ प्रश्‍न संसदेत उपस्थित केले. यासह रेल्वे बजेट व देशाच्या अर्थसंकल्पावरही भाषण केले. याच सत्रात त्यांनी जलसंधारण, नॅशनल हायवे क्र 6 चे चौपदरीकरण, गरीबरथ व राजधानी एक्सप्रेसला थांबा, जिल्ह्यात पीएमजेएसवाय योजनेची कामे, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पिक विम्याचे न मिळालेले पैसे, मेगा रिचार्ज प्रकल्प या विषयांवर संसदेचे लक्ष वेधल्याची दिल्ली दरबारी नोंद आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2014 मधील तिसर्‍या संसद सत्रात खा. खडसे यांनी 25 प्रश्‍न उपस्थित केले. यात प्रामुख्याने भुसावळ रेल्वे विभागाच्या विस्तारीकरणावर भर होता. फेब्रुवारी-मार्च 2015 मधील चौथ्या सत्राच्या पहिल्या भागात त्यांनी एकुण 28 प्रश्‍नांना वाचा फोडली. यात जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांचे प्रश्‍न, राष्ट्रीय महामार्ग दुरूस्ती, वरणगाव ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या प्रश्‍नांचा समावेश होता.

Post a Comment

Designed By Blogger