पर्यापरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा पुढाकार


गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे जय्यत तयारी सुरु आहे. भक्तांना त्यांच्या आवडत्या रूपातील बाप्पाची मूर्ती उपलब्ध व्हावी यासाठी ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्री केंद्रे सुरू झाली आहेत. मागील काही वर्षांपासून लोकांचा गणपती घेण्याचा कल पर्यावरण पुरक शाडू मातीच्या गणपती मूर्तीकडे असल्याने यंदा जळगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाडू मातीच्या मूर्तीं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यंदा जिल्ह्यात शाडू मातीच्या तब्बल ८५ प्रकारच्या मूर्त्या आकर्षक रंगात व सजावटीत उपलब्ध असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्ती महाग असल्यातरी गणेशभक्तांकडून याच मूर्तीची मागणी होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गणरायाच्या आगमनाचे वेध लहानथोरांना वेध लागले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी घरातले प्रत्येकजण आपल्या परीने तयारी करू लागले आहेत. ही मूर्ती पर्यावरणाला पूरक आणि पर्यावरणाची हानी होणार नाही अशा शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याला जास्त पसंती गणपती कलाकार देत आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही पर्यावरण पूरक गणेशोत्स साजरा करण्याकडे जळगावकरांचा कल असल्याने घरगुती बसविण्यात येणार्‍या शाडूच्या मुर्त्यांना मोठया प्रमाणात मागणी आहे. शहरातील विविध ठिकाणी गणेशमुर्ती विक्रीचे स्टॉल लागण्यास प्रारंभ झाला आहे.बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, सिध्दी विनायक, बालगणेश, पगडी गणेश, साई गणेश आदी ८५ प्रकारच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. यात यंदा केवळ हळद व गेरुपासून तयार केलेली गणेशमूर्तीचे यंदा विशेष आकर्षण असल्याचे श्री अष्टविनायक कला केंद्राचे रवींद्र हेंम्बाडे यांनी सांगितले. गणेशभक्तांच्या मागणीनुसार सहा ते चोवीस इंच पर्यंत मूर्ती उपलब्ध असून त्यांची किंमत ३५१ रुपयांपासून साडेचार हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी पर्यावरणपूरक पाणी रंग वापरण्यात आले आहेत. यामुळे मूर्तीची आकर्षकता वाढली आहे. या शाडू मातीच्या मूर्ती जळगावात टॉवर चौक, सुभाष चौक, नटवर मल्टीप्लेक्स यासह चाळीसगाव, भुसावळ, रावेर व अमळनेर येथे देखील उपलब्ध आहेत. शाडू मातीच्या मूर्तींसह पीओपी मूर्तीं देखील बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. नाशिक, पेण, सावंतवाडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, अहमदनगर या भागातून मूर्ती शहरातील बाजारपेठेत आल्या आहेत. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्ती ५१ रुपयांपासून ते १५ हजार रूपयांपर्यंत आहे तर शाडूमातीच्या मूर्ती ३५१ रुपयांपासून साडेचार-पाच हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा पीओपी तुलनेत शाडू मातीच्या मूर्तीना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. मात्र शाडू मातीच्या मूर्ती तुलनेत महाग असतात. पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची बहुतेकांची इच्छा असली तरी आर्थिक बाबींमुळे ‘पीओपी’च्या मूर्तीना काही पसंती देतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पर्यापरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा पुढाकार पर्यापरणपूरक गणेशोत्सवासाठी जळगावकरांचा पुढाकार Reviewed by Yuvraj Pardeshi on 22:49 Rating: 5

No comments: