बडे सेे बडा बिझनेस पैसे से नही एक बडी आयडीया से बडा होता है


बडे सेे बडा बिझनेस पैसे से नही एक बडी आयडीया से बडा होता है’ सन २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटामध्ये ऐकला असेलच, अशाच काही भन्नाट ‘आयडीया’ बद्दल सविस्तर माहिती माझ्या वाचकांसाठी मी घेवून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन वर्षात अनेक नाविन्यपुर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात देशात विशेषत: उद्योगशिल तरुणाईमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत ते म्हणजे ‘स्टार्टअप’! स्टार्टटप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया सारख्या अभिनव योजनांमुळे भारताने तंत्रज्ञान व माहिती प्रसारण क्षेत्रात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. उद्योग व अर्थकारण क्षेत्रातील नामांकित संस्था असोचेम व थॉट अर्बिटरेज् या संशोधन संस्थांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेतील ‘स्टार्टअप’ची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात आयटी क्षेत्रातील संख्या मोठी असून नवीन उद्योजकांची पहिली पसंती बंगरुळ शहराला आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर दिल्ली तर मुंबई तिसर्‍या क्रमांकावर येते. जागतिकस्तरावर सुमारे ८३ हजार स्टार्टअपच्या सोबत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर ४७ हजार स्टार्टअपसह ब्रिटन दुसर्‍या तर ४० हजार स्टार्टअपसह भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. बंगरुळ शहर हे ‘स्टार्टअप’चे माहेरघर म्हणून ओळखले जाते. नोंदीनुसार बंगरुळूच्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये तब्बल ४० हजारापेक्षा जास्त ‘स्टार्टअप’ सुरु आहेत. सिलीकॉन व्हॅलीमध्ये नवीन तंत्रज्ञानाला व नवीन कल्पना शक्तीला प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण या ‘स्टार्टअप’च्या क्रिएटीव्हीटीला सुरुवातीपासून प्रोत्साहित करत आहे. ‘स्टार्टअप’मुळे नवीन पिढी नोकरीच्या मागे न धावता आंत्राप्रिणर होण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. हे चित्र भारताच्या प्रगतीसाठी निश्‍चितच दिलासादायक आहे. भारतातील स्टार्टअपबद्दल बोलतांना फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम, ओला कॅब, इनमोबी यांचा प्रामुख्यांने उल्लेख करावाच लागेल! या पाच स्टार्टअपचे अवघ्या काही वर्षात एका मोठ्या उद्योग समुहात रुपांतर झाले असून हजारो कोटींची उलाढाल करणार्‍या या स्टार्टअपने एका पिढीला उद्योजक बनण्याची पे्रेरणा दिली आहे, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही.

फ्लिपकार्ट - सन २००७ मध्ये सचिन व बिन्नी बन्सल या तरुणांनी केवळ पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्टची स्थापना केली. हि कंपनी आता जीवनावश्यक सर्वच वस्तुंची ऑनलाईन विक्री करत असून त्यांचे बाजारातील मुल्य सुमारे १५ अरब डॉलर्स इतके आहे. देशातील सर्वाधिक मार्केटव्हॅल्यु असलेल्या फ्लिपकार्टला आतापर्यंत १६ गुंतवणूकदारांकडून तब्बल ३ अरब डॉलर्सची इक्वीटी फंडिंग प्राप्त झाली आहे.

स्नॅपडील - देशातील अजून एक दिग्गज ई-कंपनी म्हणून स्नॅपडीलची ओळख आहे. सन २०१० मध्ये कुणाल बहल व रोहित बन्सल यांनी केवळ ‘डील’ करुन देण्यासाठी वेबसाईटची सुरुवात केली. याच वेळी ई-कॉमर्सचे वारे वेगाने वाहत असल्याने त्यांनी स्नॅपडीलने ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण करुन अवघ्या काही दिवसात स्वत:चा दबदबा निर्माण केला. अन्य स्टार्टअपप्रमाणे स्नॅपडीलला देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली असून १४ गुंतवणूकदारांनी एक अरब डॉलर्सची रक्कम दिली आहे. कंपनीची मार्केट व्हॅल्यू तब्बल २ अरब डॉलर्स इतकी आहे.

पेटीएम - भारतातील सर्वाधिक जास्त मार्केट व्हॅल्यू असलेल्या स्टार्टअपमध्ये पेटीएमचे नाव घेतले जाते. सन २०१० मध्ये विजय वर्मा यांनी नोएडा येथे याची सुरूवात केली. पेटीएमच्या माध्यमातून आपण मोबाईल किंवा वेबसाईवरुन पैशांची देवाण-घेवाण करु शकतो तसेच विविध बिल भरणे, शॉपिंग करणे आदी कामे देखील करु शकतो. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू२ अरब डॉलर्स इतकी असून पेटीएममध्ये सैफ पार्टनर्स व इंटेल कैपिटल सारख्या नामांकित कंपन्यांनी तब्बल ६० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यासह रतन टाटा यांनी देखील यात नुकतिच गुंतवणूक केली आहे.

ओला कॅब - ऑनलाइॅन टॅक्सी बुकिंगची सेवा पुरविणार्‍या ओला कॅबची सुरूवात अंकित भाटी व भाविश अग्रवाल यांनी सन २०१० मध्ये केली. अवघ्या सहा वर्षात कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे अडीच अरब डॉलर्स इतकी झाली असून मोठ्या ९ गुंतवणूकदारांनी यात सुमारे ६८ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

इनमोबी - नवीन तिवारी, अभय सिंघल, मोहित सक्सेना व अमित गुप्ता या चार मित्रांनी सन २००७ मध्ये इनमोबीची सुरूवात केली. इंटरनेट वापराचा प्रकार व प्रोफाईलच्या आधारावर इनमोबी जाहीरात सुविधा पुरवते. या स्टार्टअपची मार्केेटव्हॅल्यू अडीच अरब डॉलर्स इतकी असून कंपनीचे १७ देशांमध्ये कार्यालये असून तेथे ९०० पेक्षाजास्त कर्मचारी कार्यरत आहेत. इनमोबीमध्ये गुंतवणूकदारांनी २२ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

2 comments :

  1. tumhala startup baddal purna mahiti ahe ka? samja Majhya kadr ek kalpana ahe te startup madhe basta ka? hey vicharaycha ahe

    ReplyDelete
  2. majhya kadil mahiti tumchyashi nakkich share karel

    ReplyDelete

Designed By Blogger